जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

शब्दचक्र-गम्मत

        शब्दचक्र बनवायचं होतं .."शब्द होता मांजर"... संबंधित आणखी शब्द सांगा म्हटल्यावर आमचे विद्यार्थी फक्त एकमेकांकडे पाहत होते...प्रमाण भाषा जरा जडच वाटत होती त्यांना. "काय म्हनतीय रे म्याडम...?" असं मी ऐकल्यावर माझंच मांजर झाल्यासारखं वाटलं...!
       आता!
       थोडी विचारात असतानाच एक मांजर वर्गात दाखल झालं. ते वर्गात शिरताच त्याला पकडून घेतलं अन् गप्पा मारायला सुरुवात केली...सुरुवातीला मीच बोलले.. पण हळू हळू निरीक्षण करत मोजक्या का होईना गप्पा रंगल्या...तेच शब्द घेऊन शब्दचक्र अवतरलं...
        आता "हत्ती" शब्दाला हत्ती ना आणावा लागू....म्हणजे झाले!
        असो! पण मांजर नाही विसरणार आता!




No comments:

Post a Comment