शिक्षण परिषद
पुष्प
3 रे
ठिकाण - जि. प. शाळा
गुरेवाडी, ता. सिन्नर
मोकळीका - Pass The Ball
ही मोकळीका कशी घ्यावी?
१) एक वर्तुळ बनवावे.
२) मोकळीकेसाठी घ्यावयाच्या घटकाच्या चिठ्ठ्या बनवाव्यात.
तसेच संगीत वाजवावे.
3) आता संगीत चालू असताना वर्तुळात चेंडू pass करावा.
४) संगीत मध्येच थांबवावे. संगीत थांबताच चेंडूही pass करणे थांबवावे, ज्याच्या हातात चेंडू असेल त्याच्यावर राज.
५) त्याने चिठ्ठी मोठ्याने वाचावी व त्यातील कृती करावी.
पुन्हा खेळ सुरू.
आपण यात पाहिजे तेवढा बदल करू शकता.
खूप साऱ्या बाबी याद्वारे आपण शिकवू शकतो.
मी याठिकाणी फक्त गमतीदार प्रश्न निवडले होते, जे थोडे वैचारिक तसेच सामाजिक जाणीव असणारेही होते, कारण खेळणारा गट तेवढा समजदार होता.
आपण वयोगट, काठिण्य पातळी , विषय, यासर्वांचाच विचार करावा.
आपल्याला शुभेच्छा...
धन्यवाद
मोकळीका - आशा चिने, शाळा गुरेवाडी
No comments:
Post a Comment