जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

Saturday, 9 February 2019

💃 *बालाविष्कार* 💃 (सांस्कृतिक कार्यक्रम )

💃🇮🇳💃🇮🇳💃🇮🇳💃
*प्रजासत्ताक दिनाच्या* औचित्याने...
बालकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी...
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी*, केंद्र - मुसळगांव, ता. सिन्नर आयोजित...



💃 *बालाविष्कार* 💃 

(सांस्कृतिक कार्यक्रम )
..... प्रगतीच्या नव्या प्रकाशवाटा...
💃🇮🇳💃🇮🇳💃🇮🇳💃
दिनांक - २६/१/२०१९ वेळ सकाळी ९.०० वा.



Playlist


     बालकांचे कलागुण अन् *"न भूतो न भविष्यति"* असा आगळा- वेगळा *कौतुकसोहळा गुरेवाडी शाळेच्या प्रांगणात* पार पडला.

    *या कौतुक सोहळ्यात विद्यार्थ्यांनी गरीब पालकांकडून किमान रुपये ३०००/- अशी आर्थिक रूपाने बक्षिसे पटकावली...*💰

      *मुसळगाव ग्रुप ग्रामपंचायत तर्फे आमच्या जिल्हा परिषद शाळेस गॅस शेगडी, चार्जिंग स्पीकर प्राप्त असून आज नेत्यांचे ५ फोटो महेंद्र कौठे यांनी भेट दिले . संरक्षण भिंत, 32 इंच एलईडी टीव्ही व संगणक प्रस्तावित आहे..*

      या कार्यक्रमाचा उद्देश गुणवत्ता, उपस्थिती व पटसंख्या वाढावा हा होता. *आमचे विद्यार्थी आम्हाला जिल्हा परिषद शाळा गुरेवाडी मध्ये दाखल करायचे आहे, खाजगी शाळेत आम्ही विनाकारण पैसे खर्च करत आहोत,* असे पालकांनी आवर्जून सांगितले व आम्ही मुलांना आता दाखल केले तर चालेल का? हेही विचारले. "या अगोदरच्या काळात शाळेची एवढी प्रगती कधीच झाली नाही!" या वाक्यात कार्यक्रमाच फलीत दडलं आहे.

     उपस्थितीची मोठी समस्या असणाऱ्या या शाळेत जिथे गृहभेटी घेतल्याशिवाय विद्यार्थी शाळेत येत नाही, कार्यक्रमाच्या निमित्ताने दररोज ही उपस्थिती शंभर टक्के राहिली हे या कार्यक्रमाचा अजून एक फलित आहे.

    आपल्याच मुलांना वेगळ्या रूपात बघून पालक भारावून गेले होते. प्रसंगी पालकांनी तोंड भरून केलेले कौतुक व गावासमोर केलेला आमचा सत्कार हा पुरस्कार स्वरूप ठरला..

*गावकऱ्यांनी मंडप व स्टेजसाठी मदत केली. तसेच फोटोग्राफी व शूटिंग मी स्वखर्चाने केली.*

💃 *कार्यक्रमाची संकल्पना, आयोजन व सूत्रसंचालन:-*
👉🏻 _*श्रीमती आशा चिने*_ 



👉🏻विशेष सहकार्य..

*पद्मा मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरेवाडी व ग्रामपंचायत मुसळगाव*



follow me on Facebook:-




Follow me on Twitter :- 

Asha Chine @aashachine



"Asha Chine" you-tube channel :-

Like, share, subscribe and press Bell icon...































कार्यक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा.... धन्यवाद..!

No comments:

Post a Comment